Share

‘मी आणि माझं बालपण’ ; सिद्धार्थची भावनिक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सिद्धार्थ जाधवने मराठीच नव्हे तर बॉलिवू़डमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. उत्तम अभिनयशैली आणि स्वभावतील गोडवा यामुळे सिद्धार्थने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.

अनेकदा सिद्धार्थ इन्स्टाग्राम, फेसबुक यावर त्याचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थने एक ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने एक खास कॅप्शन देखील असून हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक लहान मुलगा दिसत असून हा फोटो अत्यंत बोलका असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्याने त्याच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

“माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात सुंदर photo… मी आणि माझं “बालपण” .. आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण.. बोललो काहीच नाही.. फक्त अनुभवलं .. एकमेकांना…..तेजस नेरुरकर मित्रा मी तुझा मनापासून आभारी आहे… Tejas Nerurkar आज माझ्या सिध्दूला तू मला भेटवलस… आई, पप्पा, दादा , पिंकी.. LOVE UUU… खुप… #आपलासिध्दू #शिवडी #siddhumoments” , असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!