नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे. दिल्लीमध्ये सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यावेळी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. निलंबन झालेल्या खासदारांमध्ये काँग्रेस, शिवसेना, आणि तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. पावसाळी अधिवेशनावेळी हा गदारोळ पहायला मिळाला होता.
12 ऑगस्टला संसदेत कागदपत्र फेकण्यापासून ते धरपकड होईपर्यंत हायव्हेल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. त्या गोंधळावर सर्वत्र टीका झाल्याचेही पहायला मिळाले होते. त्यानंतर खासदारांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित झाला होता. निलंबित केलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस, शिवसेना, तृणमूलच्या काही खासदारांचा समावेश आहे.
गोंधळ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 6 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यात शिवसेनच्या 2 खासदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या काही खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या या 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदारांवरील कारवाईनंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस काय पाऊल उचलणार किंवा त्यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना खासदार अनिल देसाई, काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम, काँग्रेस छाया वर्मा, काँग्रेस खासदार रिपुन बोरा, काँग्रेस खासदार राजामणि पटेल, काँग्रेस खासदार सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह, सीपीएम खासदार एलामरम करिम, तृणमूल काँग्रेस खासदार डोला सेन, तृणमूल काँग्रेस खासदार शांता छत्री, सीपीआई खासदार बिनय विश्वम इत्यादी खासदारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना संघर्ष समितीच्या मागण्यांची रेल्वेमंत्री दानवेंकडून दखल; ‘ही’ रेल्वे झाली सुरु..!
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- अश्विनने मोडला हरभजनचा मोठा विक्रम; ट्विट करत केले अभिनंदन

