पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. ‘मंचावर उपस्थित आज माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी’ असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानानंतर शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल 16 सप्टेंबरला केलेल्या वक्तव्यामुळे तर त्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. चंद्रकांत पाटलांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात, मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसात पाहा, असं म्हटलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे पुन्हा एकदा दिसू लागले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले जात आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले कि. ‘मी माझ्या कामावर लक्ष देतो. चंद्रकांत पाटलांना केंद्रात मंत्री करणार असतील तर पंतप्रधान मोदींना माहीत असेल. मी विकासकामांना प्राधान्य देतो. राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे.’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच ठरलं; नागपूर जिल्हा परिषदेची निवडणुक लढवणार स्वबळावर
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

