औरंगाबाद : आता काँग्रेस पक्षाचे काम न करणाऱ्यांनाही कुठल्याच प्रकारे माफी मिळणार नाही. यामुळे यापुढे दुसर्यासोबत दिसायचे नाही. अशा प्रकरणासंबंधी तक्रार आल्यास शहानिशा करून लगेच कारवाई केली जाईल. यामुळे मॅच फिक्सिंग चालणार नाही अशा कठोर शब्दात पटोले यांनी मेळाव्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना थेट इशारा दिला.
येत्या काळात जोमाने कामाला लागायचे आहे. त्याकरिता आवश्यक असलेले बूथ तयार करा. त्या दृष्टीने मजबूत बांधणी करा. महिनाभराचा वेळ देतो, पुढे त्या भूत कमिटी मधील कार्यकर्त्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण द्यायचे याचेही नियोजन तयार आहे.
प्रशिक्षण देण्याकरिता वेगळी माणसे पाठवली जाईल. आता काम करा, काम न करणाऱ्यांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही. औरंगाबाद माझ्या करिता अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच जालना, बीड, उस्मानाबाद अशा संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेस पुन्हा त्या ताकतीने उभी केली जाणार आहे. असा निश्चय देखील त्यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेट्रोल-डिझेलवरील कराचा एकही रुपया कमी होणार नाही’; सीतारामन यांनी सांगितलं ‘हे’ कारण
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
- कोविड प्रतिबंधाकरीता नागरिकांनीही प्रयत्न करावेत – आदित्य ठाकरे
- ‘एक गोष्ट लाख सत्य, अमेरिकेने पूर्ण जगाशी गद्दारी केली अन्…’; जितेंद्र आव्हाड संतापले
- पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठं केलंय; गोपीचंद पडळकर यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

