Share

आयपीएलमुळे सामना रद्द; इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं सुचक वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : 10 सप्टेंबरपासून म्हणजेच कालपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तत्पूर्वी, प्रमुखांसह चार सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्ववभूमीवर हा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघाची संमती घेऊन हा सामना दोन-तीन दिवसांसाठी स्थगित केल्याचे बोललं जात आहे.

मालिकेतील शेवटचा सामना रद्द झाल्यांनतर सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची दिसत आहे. भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं.

मात्र, हा सामना कोरोनामुळे नव्हे तर पुढची परिस्तिथी पाहता रद्द केला आहे. असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. भारत इंग्लंड यांच्यातील सामना पुढे ढकलला तर आयपीएलला मोठा फटका बसू शकतो, असं सुचक यांनी केल्याचं वृत्त इंग्लंडमधील माध्यमांनी दिलं आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीज आता संपली आहे. उर्वरित सामना जरी खेळवला गेला, तरी सामना हा मालिकेचा भाग नसणार असल्याचं, टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!