Share

अचानक कसोटी रद्द केल्यामुळे इंग्लंड क्रिकेटला 200 कोटींचा बसू शकतो फटका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता हा सामनारद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेटने मिळून खेळाडूंच्या आरोग्याचे हित लक्षात घेता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मंडळांच्या संमतीने सामना काही दिवसात घेतला जाईल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 सप्टेंबर रोजी मँचेस्टरमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच घेण्यात आला. भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्व खेळाडूंना सरावही करण्यापासून थांबवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हॉटेल रूममध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

ऐनवेळी मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे ECB ला 20 दशलक्ष पौंड (सुमारे 200 कोटी रुपये) नुकसान होणार आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या देशांतर्गत लंकाशायर क्रिकेट क्लबला दहा लाख पौंड (सुमारे 10 कोटी रुपये) नुकसान झाले आहे. जे चाहत्यांना तिकीट विक्रीचे संपूर्ण पैसे परत करेल.

मालिकेच्या निकालावर अजूनही शंका 

बीसीसीआयच्या मते, ही मालिका अजून संपलेली नाही आणि भारत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेचा शेवटचा सामना नंतर दोन्ही मंडळांच्या परस्पर संमतीने नवीन तारखेला खेळला जाईल. दुसरीकडे, इंग्लंड क्रिकेटचे विधान आहे की खेळला जाणारा सामना हा एकमेव कसोटी असेल आणि त्याचा मालिकेशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!