Share

Ind vs Eng : इंग्लंडला स्वतःला विजयी घोषित करायचे होते पण…

Published On: 

नवी दिल्ली : टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर भारतीय खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली पण सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. भीतीमुळे कोणालाही खेळायचे नव्हते, तरी मालिकेतील अंतिम कसोटी सामना नाणेफेक करण्यापूर्वी दोन तास मागे घ्यावा लागला. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती.  भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यातील ऑनलाइन बैठकीनंतर खेळाडूंना कळवण्यात आले की सामना रद्द करण्यात आला आहे आणि तुम्ही सर्व आपल्या रूममध्ये रहा.

भारतीय संघाच्या खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्यानंतर ईसीबी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात स्वतःला विजेता मानण्यास सांगत होता, ज्यावर बीसीसीआयने आक्षेप घेत त्यांना सामान रद्द करण्यासाठी दबाव आणला. यानंतर, ईसीबीने म्हटले, ‘भारतीय संघात कोरोनाची प्रकरणे आणखी वाढण्याच्या शक्यतेमुळे भारत आपला संघ मैदानात उतरवू शकत नाही. बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर, ईसीबी ओल्ड ट्रॅफर्डमधील पाचवी कसोटी रद्द झाल्याची माहिती दिली.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. नंतर जेव्हा हा कसोटी सामना खेळला जाईल तेव्हा या मालिकेतील विजयी संघ निश्चित केला जाईल. हा कसोटी सामना आता कधी खेळला जाईल हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी भविष्यात योग्य वेळी त्याचे आयोजन केले जाईल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!