🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मँचेस्टर कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंचे आरोग्य लक्षात घेऊन दोन्ही मंडळांनी शेवटचा सामना रद्द केला आणि हा सामना पुढील काही दिवसात आयोजित करण्याचे मान्य केले.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर भाष्य करणारा भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सध्या टीम इंडियामध्ये कोणतं वातावरण आहे याचा खुलासा केला आहे. दिनेश कार्तिकम्हणाला, ‘मी काही भारतीय खेळाडू बोललो. मालिकेतील सर्व सामने शेवटच्या दिवसापर्यंत खेळले गेले. सर्व खेळाडू थकले आहेत आणि संघात जवळपास एकच फिजिओ होता आणि त्याला देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही एक मोठी समस्या भारतीय संघासमोर आहे. आणि म्हणूनच जेव्हा फिजिओला कोरोनाची लागण झाली तेव्हा भारतीय संघातील खेळाडू घाबरू लागले आहेत.
भारतीय टीममध्ये शास्त्रींना प्रथम कोरोनाची लागण झाली. शास्त्रींनी लंडनच्या हॉटेलमध्ये त्यांचे पुस्तक प्रकाशित केले होते त्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. या कार्यक्रमात बाहेरून आलेल्या लोकांना परवानगी देण्यात आली होती. सूत्रांनी सांगितले की रवी शास्त्रींनंतर आणखी कोरोनाची किती प्रकरणे आढळतील हे सांगता येणार नाही, त्यामुळेच खेळाडूंना विलिगिकारणात ठेवण्याची खबरदारी घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- Ind vs Eng : इंग्लंडला स्वतःला विजयी घोषित करायचे होते पण…
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
