🕒 1 min read
मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करुन महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगणरायांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण होईल. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही.
चैतन्यपूर्ण, भक्तीमय वातावरणात बुद्धीची देवता श्रीगणरायांचं आगमन होत आहे. श्रीगणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!#GanpatiBappaMorya pic.twitter.com/j2W9CEpBll— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 10, 2021
बुद्धीची देवता श्रीगणरायांच्या समस्त भक्त बंधू-भगिनींनी यंदाही सुरक्षित वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसंच श्रीगणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सव काळात सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
