🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचा जमाना आहे. अनेक मूल – मुली विवाहाच्या बंधनात अडकण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाण पसंत करतात. मात्र एका सर्व्हेतून असं समोर आला आहे की, लिव्ह-इन रिलेशनशिपच्या तुलनेत विवाहित महिला जास्त सुखी असतात. हा सर्व्हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संघटनेने केला आहे. हा अहवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच प्रसिद्ध करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील संस्था ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानंतर राजस्थान येथील पुष्कर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत या सर्वेक्षणावर चर्चा देखील झाली. त्यावेळी विवाहित महिलांचा आनंदी राहण्याचं प्रमाण जास्त आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांचं आनंदी राहण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे, असं या बैठकीत सांगण्यात आलं आहे.
या सर्वेक्षणानंतर निघालेला निष्कर्ष मंगळवारी मोहन भागवत प्रसिद्ध करणार आहेत. संघाचे प्रचार प्रभारी अरुण कुमार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शनिवारी अधिकृत वक्तव्य जारी करुन मोहन भागवत नियमित प्रक्रियेअंतर्गत विदेशी माध्यमांना सामोरे जातील. विविध क्षेत्रातील लोकांना भेटण्याच्या संघाच्या एका नियमित प्रक्रियेचा भाग आहे. भागवत यावेळी संघ, त्यांच्या कार्यप्रणालीबाबत विदेशी माध्यमांशी चर्चा करतील.
https://twitter.com/Maha_Desha/status/1175704619143450626?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
