Share

तीन लाखांसाठी घेतला विवाहितेचा जीव; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

Published On: 

बीड: हुंडाबळीच्या घटना आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. बांगडीचा व्यापार करण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये घेऊन ये म्हणत केला विवाहितेचा छळ अखेर पैसे न आणल्याने घेतला जीव. ही घटना आहे जिल्ह्यातील सिरसाळा इथली. या प्रकरणी संबंधित सासरच्या लोकांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

सिरसाळा येथील सलीम शेख यांची मुलगी सुमया हिचा विवाह १४ मार्च २०२१ रोजी परळी येथील पेठ मोहल्ला येथील सद्दाम शेख याच्यासोबत झाला होता. परंतु लग्न होऊन पंधरा दिवसांनंतर सुमया माहेरी सिरसाळा येथे आली होती. त्यावेळी तिने सांगितले की, सासरचे लोक खूप त्रास देत असून वडिलांकडून बांगड्यांचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करून मानसिक छळ करत असल्याचे सांगितले. परंतु मुलीच्या वडिलांनी आत्ताच लग्न झाले, एक महिन्यात पैसे जमवून देतो असं म्हणून मुलीची समजूत काढून मुलीला सासरी पाठवले.

परंतु सासरच्यांनी तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ सुरूच ठेवला आणि शेवटी तिचा खून करण्यात आला. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी पती सद्दाम शेख, परवीन शेख, खैसर शेख, समरीन शेख, अमेर शेख, इम्रान शेख यांच्यावर हुंडाबळी कलमानुसार परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरून परळी शहर ठाण्यात हुंडाबळी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक हेमंत कदम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!