Share

अंशतः लॉकडाऊनमध्ये लग्न, वधु-वराकडील सात जणांवर गुन्हे दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लग्न समारंभ, मंगल कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश असतानाही नारेगावात एका मंगल कार्यालयात तब्बल १०० ते १५० जणांची लग्नासाठी गर्दी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार नारेगावातील गोल्डन हॉल येथे घडला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मंगल कार्यालय मालकासह वधु-वराकडील सात जणांवर गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारेगावातील गोल्डन हॉल येथे लग्न समारंभ सुरू असून मोठी गर्दी जमा झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी आपल्या पथकासह मंगल कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत लग्नसमारंभ आटोपला होता.

दरम्यान, पोलिसांनी मंगल कार्यालयाचा मालक कासीम शेख, मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक फईम शेख, जफर शेख यांच्यासह नवरदेव इम्रान पठाण, नवरदेवाचे वडील अन्सार पठाण, नवरी शहेनाज शेख तिचे वडील हारूण शेख अशा सात जणांवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!