Share

दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

हिंगोली: नवीन कार घेण्यासाठी माहेरी जाऊन दहा लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून एका विवाहितेचा छळ करण्यात आला असून या बाबत पतीसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन गाडी घेण्यासाठी १० लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण करण्यात येत होती तसेच तिला मानसिक त्रास देखील देण्यात येत होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल अविनाश स्वामी राहणार एकदंत बिल्डिंग, दीपाली पार्क जवळ, मांजर्ली बदलापूर, जिल्हा ठाणे, ह. मू. बसवेश्वरनगर वसमत या विवाहितेस ता. ५ जानेवारी २०२० ते ता. १२ मार्च २०२१ या कालावधीत सासरच्या मंडळींनी माहेराहून नविन कार घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत मारहाण केली.

विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ करत शिविगाळ करण्यात येत होती. याबाबत कोमल स्वामी यांनी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती अविनाश स्वामी, सासरा सतीश स्वामी, सासू जयश्री स्वामी, ननंद अश्विनी स्वामी सर्व राहणार मांजर्ली बदलापूर, जिल्हा ठाणे, मावस सासू सुरेखा स्वामी राहणार पुणे, चुलत सासरा सुरेश स्वामी राहणार लातूर व चुलत ननंद अंजली स्वामी राहणार पुणे या सासरच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!