🕒 1 min read
सिंधुदुर्ग : राज्यासह देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थांमधील कमतरता, अद्ययावत उपकरणांची गरज, मनुष्यबळ या गोष्टी प्रकर्षाने समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागांमधील रिक्त जागांची त्वरित भरती करण्याची गरज उद्भवली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती जाहीर केली आहे. त्यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा होणार.
28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा राजेश टोपे यांनी सोमवारी औरंगाबादेत केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहे. तर साडे आठ हजारांपैकी सुरुवातीला 5 हजार जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
आता या भरती प्रक्रियेच्या परीक्षा नियोजनाबाबत प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. राज्यात कोरोनाची वाढती स्थिती घेऊन प्रवासातील धोका टाळण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या जवळचे परीक्षा केंद्र देणे गरजेचे होते. मात्र, कोकणातील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील तर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना कोकणातील परीक्षा केंद्र दिले गेल्याचे समोर आले आहे.
येत्या २८ तारखेला शासनाने आरोग्य सेवक पदाच्या परिक्षा ठेवल्या असुन मराठावाडयातील विद्यार्थ्यांना कोकणात सेंटर दिले असून कोकणातील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील सेंटर दिलेत. एवढा लांब प्रवास करणे खर्चीक व कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच परिक्षा सेंटर दिले पाहिजे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 23, 2021
याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करून विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिलं जावं अशी मागणी केली आहे. ‘येत्या २८ तारखेला शासनाने आरोग्य सेवक पदाच्या परिक्षा ठेवल्या असुन मराठावाडयातील विद्यार्थ्यांना कोकणात सेंटर दिले असून कोकणातील विद्यार्थ्यांना मराठवाड्यातील सेंटर दिलेत. एवढा लांब प्रवास करणे खर्चीक व कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच परिक्षा सेंटर दिले पाहिजे.’ अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड यांनी ओंगळवाणं शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय’
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- जगातील सर्वात मोठे स्टेडियम आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार
- ‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… पवार साहेब फक्त नाराज होणार पण कारवाई नाही होऊ देणार’
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
