Share

‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… पवार साहेब फक्त नाराज होणार पण कारवाई नाही होऊ देणार’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : वनमंत्री संजय राठोड काल (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल होते. मात्र, काल ते समोर आले. यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेनेच्याच मंत्र्याने केराची टोपली दाखवल्याची टीका विरोधकांनी केली होती. दरम्यान, या घटनेनंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या पोहरादेवी मधील शक्ती प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्यामुळे संजय राठोड यांच्या अडचिनीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आता, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्या नाराजीवरून त्यांनाच लक्ष्य केलं आहे.

‘तुमचेच दात आणि तुमचेच ओठ… एक निरपराध मुलीचा जीव गेला तेव्हा नाराजी कुठे गेली होती??? एखादं युद्ध जिंकल्यासारखा एक हत्येचा आरोपी बिनधास्त फिरतो त्यावर पवार साहेब फक्त नाराज होणार पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई नाही होऊ देणार,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!