🕒 1 min read
अहमदाबाद : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. हा सामना सुरु होण्याआधी पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला. या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
उद्घटनादरम्यान, मोटेरा स्टेडियमला देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांचे नाव देण्यात आले आहे. मोटेरा स्टेडियमचे नामांतर करून नरेंद्र मोदी स्टेडियम असे नाव देण्यात आले आहे. देशभरातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला आता नरेंद्र मोदी स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
हे नवीन नरेंद्र मोदी स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या स्टेडियमची आसनक्षमता १ लाख १० हजार एवढी आहे. या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली भूषणसिंह राजे होळकरांनी मागणी
- भाजप राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे; वरिष्ठ नेत्याचा घरचा आहेर
- दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध
- ‘पालघर साधू हत्याकांडापासून पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत कडक कारवाई महाराष्ट्रातील जनता बघतेच आहे’
- ‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
