Share

‘विराट कोहली कोणतं काम करु शकत नाही?’, ICC ने शेअर केला व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : चेन्नईमध्ये इंग्रजांना पाणी पाजल्यानंतर विराट सेना आता अहमदाबाद मधील नव्या कोऱ्या मोटेरा स्टेडियममध्ये इंग्रजांना धूळ चरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (२४ फेब्रुवारी)  अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीची  ‘रन मशिन’ अशी ओळख आहे. विराटनं त्याच्या क्रिकेट करियरमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. विराट एक चांगला बॅट्समन, चपळ फिल्डर आणि यशस्वी कॅप्टन आहे. त्याचबरोबर विराट बॉलिंग देखील करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (ICC) एक व्हिडीओ शेअर करुन विराटबाबत एक खास प्रश्न विचारला आहे.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील उर्वरित दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होणार आहेत. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवरील टीम इंडियाच्या प्रॅक्टीसचा हा व्हिडीओ आहे. त्याचवेळी विराट कोहली बॉलिंगचा सराव करताना दिसत आहे. विराटच्या बॉलिंगचा व्हिडीओ आयसीसीनं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

आयसीसीने या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की, ‘असं कोणतं काम आहे जे विराट कोहली करु शकत नाही?’ अर्थात विराटनं पहिल्यांदा बॉलिंग केलेली नाही. यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये देखील बॉलिंग केली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्यानं बॉलिंग केली आहे. विराटने वन-डे आणि टी-20 मध्ये मिळून एकूण आठ विकेट घेतल्या आहेत. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला अजून एकही विकेट मिळालेली नाही.

https://www.instagram.com/p/CLo6rrol5Mh/?utm_source=ig_web_copy_link

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!