🕒 1 min read
नाशिक : नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या ३ ते ५ डिसेंबर रोजी होईल. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जावेद अख्तर आणि गुलजार यांची नावे पुढे येताच ब्राह्मण महासंघाने त्याला तीव्र विरोध दर्शवल्याने संमेलनातील वादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
खगोलशास्त्रज्ञ, ज्येष्ठ लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाला अवघे २०-२५ दिवस बाकी आहे. दरम्यान, उद्घाटनासाठी जावेद अख्तर, गुलजार यांची नावे पुढे येताच ब्राह्मण महासंघाने त्याला कडाडून विरोध केला आहे. जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी साहित्यात भरीव योगदान असे काय आहे? असा सवाल करण्यात आला आहे.
साहित्य सृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात असताना नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या या विकृतांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना असाच एकदा सन्मान दिला गेला होता. आम्ही त्यावेळेस पण विरोध केला होता. आदल्या दिवसापर्यंत ठिकठाक असणारे दिब्रिटो ग्रंथदिंडीच्या वेळी आजारी पडले आणि नंतर पुन्हा मोठे भाषण करायला मोकळे होते. दिब्रिटो असो की गुलझार, जावेद अख्तर यांना अशा महत्वाच्या पदांवर बसवू नये. सन्माननीय जयंत नारळीकर साहेबांसारखा अध्यक्ष असताना वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते हे उद्घाटन होण्यास आमचा विरोध राहील अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाची बातमी! एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
- इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी आंदोलन
- ‘बळीचा बकरा शोधू नका, चुकांची फळ भोगायला तयार राहा’, नवाब मलिकांच्या मुलीचा फडणवीसांना इशारा
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही राजेंची बिनविरोध निवड
- ‘आम्ही भडकवले तरी एसटी कर्मचारी मूर्ख नाहीत, ते न्याय हक्कासाठी लढत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
