Share

तिहेरी तलाक झालं, कलम 370 झालं , मोदींचे लक्ष्य आता ‘सामन नागरी कायदा’ : शिवसेना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात महत्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावला आहे. कलम 370 आणि तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याच्या तरतुदी नंतर मोदी सरकारने ‘समान नागरी कायद्या’च्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कुटुंब नियोजनावर भाष्य केले. यावरून शिवसेनेने पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा अचूक वेध घेत मोदींचे लक्ष आता ‘समान नागरी कायद्या’कडे आहे, असे आपल्या अग्रलेखात लिहिले आहे.

वाचा अग्रलेखाचे प्रमुख मुद्दे

  • पंतप्रधान मोदी एकापाठोपाठ एक झपाटय़ाने निर्णय घेऊ लागले आहेत. गेल्या 70 वर्षांत भिजत पडलेली घोंगडी झटकून समस्यांचा निचरा करीत आहेत. मोदी यांना आता प्रश्न विचारला जात आहे की, तिहेरी तलाकविरुद्ध कायदा केलात. कश्मीरमधील 370 कलम काढून फेकले. आता देशात समान नागरी कायदा कधी लागू करणार? आम्हाला खात्री आहे आता तो दिवसही दूर नाही. हा प्रश्नही आता निकाली लागेल. मोदी व शहा यांनी त्या दिशेने दोन पावले आधीच पुढे टाकली आहेत.
  • राज्य स्वतःचे वेगळे कायदे व ‘निशान’ घेऊन हिंदुस्थानच्या छातीवर बसले होते. मोदी सरकारने छातीवरचे हे ओझे फेकून दिले व समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा करणारे दुसरे मजबूत पाऊल टाकले. ही दोन्ही देशविरोधी कलमे काढून सरकारने जणू समान नागरी कायदा आणलाच आहे. तिहेरी तलाकमधून मुसलमानांचे ‘शरीयत’ म्हणजे त्यांचा तो ‘पर्सनल लॉ’ गेला. या पर्सनल लॉमध्ये कुणालाही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, असे दाढय़ा कुरवाळीत धमक्या देणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले ते त्यांनाच माहीत. तिहेरी तलाक पद्धती बंद करून सरकारने सगळय़ांसाठी एकच कायदा हे धोरण मान्य केले.
  • पंतप्रधान मोदी यांनी ‘समान नागरी कायद्या’च्या दृष्टीने तिसरे पाऊल कालच्या स्वातंत्र्य दिनी टाकले. पंतप्रधानांनी कुटुंबनियोजनाचा डंका लाल किल्ल्यावरून वाजवला आहे. लोकसंख्यावाढ हे देशापुढील आव्हान आहे व कुटुंबनियोजन ही देशभक्तीच आहे, असे ठासून सांगितल्याने मुसलमान समाजाने कुटुंबनियोजन त्यांच्या ‘शरीयत’ला मान्य नसल्याची बांग ठोकू नये. किंबहुना लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सगळय़ांचीच आहे. मुसलमानांइतकीच ती हिंदूंचीही आहे.
  • बुलेट गती’ने वाढणारी लोकसंख्या आपल्या देशाच्या येणाऱया पिढय़ांना अडचणीची ठरत आहे. लोकसंख्येचा स्फोट हेच हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या समस्यांचे कारण आहे. गरिबी, दारिद्रय़, बेरोजगारीचे तेच मूळ आहे. हिंदुस्थानच्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोक पूर्णपणे साक्षर नाहीत. आजही 45 टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली आहेत. आर्थिक विषमता मोठी आहे. वाढत्या लोकसंख्येने धार्मिक व जातीय अराजकतेला निमंत्रण दिले आहे. 1947 साली देशाची फाळणी झाली तेव्हा देशात साधारण अडीच कोटी मुसलमान होते. आज हा ‘बॉम्ब’ बावीस कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
  • जनसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणावा अशी मागणी आहे व तशा हालचाली सुरू आहेत हे मोदी यांनी भाषणात सांगितले. त्यामुळे समान नागरी कायदा आलाच आहे. देशात धर्माच्या नावावर कायदेबाजी चालणार नाही. देशाच्या मुळावर आलेले धार्मिक कायदे मोदी सरकारने मोडून टाकले. आता देशात एकच कायदा, तो म्हणजे भारतीय घटनेचा! तशी मजबूत पावले पडलीच आहेत. समान नागरी कायदा म्हणजे यापेक्षा वेगळा काय असतो!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!