मुंबई : आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं. आज महाराष्ट्रात अनेक मराठी घरं आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात आज (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिवस साजरा केला जात आहे. आजवर अनेक मराठी भाषिकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर जगभरात विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही, किंबहूना क्रिकेटच्या इतिहासात भारतीय खेळाडू आणि त्यातही मराठी क्रिकेटपटूंचे योगदान हे अनन्यसाधारण असे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे महाराष्ट्रीयन गोलंदाज –
1. सुभाष गुप्ते – मुंबईत जन्मलेल्या सुभाष गुप्ते यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९५१ ला इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३६ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी २९.५५ च्या सरासरीने १४९ विकेट्स घेतल्या. यात त्यांनी १२ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
2. सचिन तेंडूलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेच पण त्याचबरोबर त्याने गोलंदाजीतही त्याचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ वनडे आणि १ टी२० सामना असे मिळून ६६४ सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.५३ च्या सरासरीने २०१ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने २ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने दोन्ही वेळा वनडेत ५ विकेट्स घेतल्या आहेत.
३. रवी शास्त्री – मुंबईचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्रींनी फेब्रुवारी १९८१ ला न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही भरीव कामगिरी केली आहे. शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८० कसोटी आणि १५० कसोटी सामने असे मिळून एकूण २३० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३८.६९ च्या सरासरीने २८० विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी ३ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
4. अजित आगरकर – मुंबईचा असणाऱ्या अजित अगरकरने एप्रिल १९९८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्यानंतर २६ कसोटी, १९१ वनडे सामने आणि ४ टी२० सामने खेळले. त्याचा २००७ च्या पहिल्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघातही समावेश होता. त्याने एकूण २२१ सामने खेळताना ३१.०९ च्या सरासरीने ३४९ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली.
5. झहिर खान – श्रीरामपूरमध्ये जन्मलेल्या झहिर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. २०११ च्या विश्वचषकातही तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने ऑक्टोबर २००० ला केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने त्यानंतर ९२ कसोटी, २०० वनडे आणि १७ टी२० सामने असे मिळून ३०९ सामने खेळले.
महत्त्वाच्या बातम्या
- दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मराठा आरक्षण आंदोलनाचा ३९ वा दिवस; आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
- ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
