मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली ‘रोखठोख’ भूमिका जाहीर केली आहे. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला होता. मात्र, कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर समाजाने संयम पाळावं असं आवाहन सर्वच नेत्यांनी केलं होतं.
मात्र, आता संभाजीराजे यांचा आज रौद्रावतार पाहायला मिळाला. समाजाच्या आरक्षणासाठी, त्यांच्या व्यथांसाठी आता तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली आहे. ६ जून म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनापासून मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
इतकंच नाही तर आता ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा दिल्लीत देखील घुमणार आहे. कारण, मराठा समाजाचे प्रश्न देशासमोर मांडण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिन ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत पहिली गोलमेज परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी, राज्यातील सर्व आमदार-खासदार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित राहावं यासाठी मी आमंत्रित करतोय, असं भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे. यासोबतच, मराठा समाजासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अन्यथा समाज त्यांना बरोबर धडा शिकवेल, अशी तंबीच दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- ६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल – संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

