Share

मराठा आरक्षण : ‘कोर्टाच्या थपडा खाऊन ठाकरे सरकारचे तोंड सुजले आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस होता. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे.

घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगत घटनापीठाने ही स्थगिती उठवण्यास नकार दिला. २५ जानेवारीला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून याआधीच राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली होती. आता, स्थगिती उठवण्यास या खंडपीठाने तात्पुरता नकार दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीवरून राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘कोर्टाच्या थपडा खाऊन ठाकरे सरकारचे तोंड सुजले आहे. मराठा आरक्षण या विषयाचाच या कुचकामी सरकारने विचका केला आहे…’ अशी बोचरी टीका त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!