मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात ईडीने कारवाई केली होती. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या पथकाने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीसाठी प्रताप सरनाईक यांना वारंवार नोटीसा बजावल्या होत्या. ईडीच्या कारवाई विरोधात प्रताप सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कारवाई न करण्याचे आदेशच दिले आहेत. त्यामुळे सरनाईक ईडीच्या तीन समन्सनंतरही हजर न राहिल्याने त्यांच्यावर कारवाई होणार अशा चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तर, आता तब्बल २ आठवड्यांहून अधिक काळ ईडी चौकशीसाठी प्रतीक्षेत होती. अखेर ती वेळ आली आहे. उद्या प्रताप सरनाईक हे पुत्र विहंग सरनाईक याच्यासह ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
काल, मंगळवार निमित्त प्रताप सरनाईक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. ते सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘जगावरील कोरोनाच संकट, देशातील शेतकऱ्यांचं संकट आणि सरनाईक कुटुंबावर असलेली ईडा-पिडा टळो यासाठी देवाकडं गाऱ्हाणं बाप्पाला घातलं’ असं त्यांनी सांगितलं.
तर, ‘क्वारंटाईनमध्ये असल्याने बरेच दिवस भेट झाली नसून ईडीच्या नोटिसा देखील आल्या आहेत. त्यांना उत्तर देखील दिलं असून ईडी ही भारतातील फार मोठी संस्था आहे. देशातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर काढली आहेत. त्यामुळे त्या संस्थेला सहकार्य करणार’ असल्याचं ते म्हणाले होते. यानंतर आता ते उद्या चौकशीला हजर राहणार टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमचा आवाज दाबू देणार नाही; बंदीनंतरही शिर्डीत प्रवेश करण्यावर तृप्ती देसाई ठाम!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- ‘शेतकऱ्यांच्या पैशावर मजा मारणारी ही बांडगुळं नष्ट व्हावीत म्हणूनच मोदींच कृषी विधेयक’
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- कधी-कधी मला असं वाटतं की मी मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसू नये- ममता बॅनर्जी


