Share

सिटी चौक ते किलेअर्क रस्ता घेणार मोकळा श्वास! मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम

Published On: 

औरंगाबाद : सिटी चौक ते किले अर्क रस्त्यातील बाधित मालमत्ता हटविण्यासाठी महापालिकेच्या वतीने मंगळवारी (दि.५) मार्किंग करण्यात आली. रस्त्याच्या कामात बाधित होणारी, तसेच ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभीकरणास अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिटीचौक ते किलेअर्क रस्त्यात बाधित १९ मालमत्तांसह मोंढा परिसरातील जाफर गेट व नारेगाव येथील सुखना नदीपात्रात ही मार्किंग करत अतिक्रमणधारकांना स्वतःहून आपली बांधकामे काढून घेण्यासाठी पालिकेने वेळ दिला आहे. त्यानंतर पालिका स्वतः अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे.

जुन्या शहरातील सिटीचौक ते किलेअर्क या ३० मीटर रूंद डीपी रोडवरील अतिक्रमणे लवकरच हटवली जाणार आहे. अतिक्रमणे असल्यामुळे या रस्त्यांच्या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे पालिका आयुक्‍त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्‍त आयुक्‍त-२ रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी रोहिला गल्ली ते किलेअर्क दरम्यान असलेल्या अतिक्रमणांची मार्किंग केली.

नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात नोटिसाही बजावल्या. तसेच शहरातील जुना मोंढा येथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेतलेल्या जाफरगेट सुशोभीकरणाच्या कामात काही अतिक्रमणे असल्याने तेथेही पाहणी केली. पथकाने संबंधितांना नोटिसा देत अतिक्रमणे काढून घेण्यास बजावले.

या पथकाने नारेगाव येथील सुखना नदी पात्राचीही पाहणी केली. नदी पात्रात सुमारे २० बाय ५० फुटांच्या आकाराचे पत्र्याचे शेड दिसून आले. तेव्हा शेडधारकास अतिक्रमण काढून घेण्याची सक्‍त ताकीद दिली. पालिकेने सिटीचौक, जाफरगेट व नारेगाव सुखना नदी परिसरातील अतिक्रमणधारकांना स्वतःहून बेकायदा बांधकामे काढून घेण्यासाठी तीन दिव

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!