बीड : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे.
यासंदर्भात बीडमध्ये आज (६ मे ) मराठा आरक्षण रणनीती संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली आहे. कोविडमुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचं लक्ष्य लागलं होतं.
या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली. यामुळे कोरोना हाताळताना त्रेधा तिरपीट झालेल्या राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुर नवा’च्या सेटवर आ. सरदेसाईने गोधंळ घालत चित्रीकरण बंद करण्याची केली मागणी
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे – खेडेकर
- पुन्हा एकदा कॅप्टन कूल धोनीने जिंकले चाहत्यांचे मन ; घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवावा’
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

