जालना: जिल्ह्यातील अंबड येथील साष्टपिंपळगाव येथील चौदा दिवसापासुन अख्खे गाव ठिय्या मांडून बसलेलले आहे. या आंदोलनाचे लोण गावापुरते मर्यादीत राहिले नाही, दररोज हजारो समाजबांधव येऊन गावकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. राज्यात विविध ठिकाणी या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. यातच जालना शहरात सलग तीन दिवस वेगवेगळ्या स्वरुपाचे आंदोलन होणार असल्याने शहरातील पोलीस प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
शहरात ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन होणार आहे. तर ६ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय छावाच्या वतीने अंबड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. तर ७ फेब्रुवारी रोजी विनायक मेटेंच्या शिवसंग्रामच्या वतीने मातोश्री लॉन्ससमोर मराठ्यांचा यल्गार मेळावा होणार आहे. या विविध आंदोलनामुळे जालना पोलीस प्रशासनासमोर पेच वाढला आहे.
जालना जिल्हा पोलीसांचे मनुष्य बळ १६०० इतकं आहे. ६ फेब्रुवारी रोजी अंबड तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचीयतीत उपोषण होणार आहे. यावेळी जर काही अघटित घडले किंवा जर आंदोलक आक्रमक झाले तर पोलीस प्रशासनाला परिस्थिती आटोक्यात करायला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मराठा आरक्षणाची अंतीम सुनावणी ५ फेब्रुवारी पासुन होणार आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत भरती पुढे ढकला, अशी मागणी आंदोलकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- किसान रेल अंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन रेल्वे सुरू
- इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ फलंदाज पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
- जो सल्ला राज्य सरकारला दिला तोच सल्ला केंद्राला द्या; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही, मग तुम्ही हिंदुत्व का सोडलं? ; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

