Share

हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही, मग तुम्ही हिंदुत्व का सोडलं? ; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई : हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले होते.

त्यानंतर आता त्यांच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. नुसतं भाषणातून बोलत चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरु होते, तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागते. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडलं एवढंच सांगावं,’ असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केलं होतं ते करुन दाखवावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात आपण निदर्शन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!