Share

किसान रेल अंतर्गत केंद्र सरकारकडून नवीन रेल्वे सुरू

Published On: 

नांदेड : कृषी विभागाच्या मार्केटींगकरिता शेतकऱ्यांना विविध सेवा मिळवून देण्यासाठी किसान एक्सप्रेस मागच्या महिन्यात नगरसोल येथून सोडली आहे. या मध्ये गतीने वाहतूक, सुरक्षित वाहतूक या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाच्या वाहतूक करण्यासाठी सुलभ होणार आहे.

दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातील नगरसोल येथून ३१ जानेवारीपर्यंत 33 किसान विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. या ३३ किसान रेल्वे मधून १३६५८ टन कांदा पाठवला आहे. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी पाठवल्या आहेत. आत्तापर्यंत 33 किसान रेल्वेमधून नांदेड रेल्वे विभागास ६.५८ कोटी चा महसूल मिळाला. नांदेड विभागात या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस अजून ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.

२ फेब्रुवारीपर्यंत विविध ठिकाणाकरिता आणखी १०५ किसान रेल्वेची मागणी नोंदवली आहे. किसान रेल्वे व्यतीरिक्त नांदेड विभागाने या वर्षी माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करून वसमत, औरंगाबाद, परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रॅक पाठवले. तर आदिलाबाद येथून ५ मक्याचे रॅक पाठवले. हिंगोली रेल्वे स्टेशनवरुन ३ वर्षाच्या अंतरानंतर सरकीचे ३ रेक पाठवले. मालटेकडी येथून गुळाचे ५ रॅक पाठवले.

नियोजित वेळेवर माल पोहोचतो
या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावत असतात. अंदाजे ५० किलोमीटर प्रती तास गतीने धावत असतात. कृषी माल वेळेवर पोहोचवल्या जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स – टॉप टू टोटल च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित केलेल्या फळ, भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दरामध्ये सवलत देण्याची घोषणाही केली आहे. नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतूकीसाठी ५० टक्के दर सवलत दिली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना करता येणार उद्योगाचे विस्तारीकरण
या रेल्वेच्या माध्यमातून मराठवाड्यामधील केळी, कापुस, ऊसासह पालेभाज्या, फळांना बाहेर राज्य तसेच बाहेरच्या जिल्हामध्ये शेतकऱ्यांना आपापले कृषी उत्पादनाची विक्री तसेच मार्केटींकरण्यासाठी देशभरामध्ये मोठी संधी केंद्र सरकारने उपलब्ध करुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!