Share

इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ फलंदाज पहिल्या दोन कसोटीतून बाहेर

Published On: 

चेन्नई : ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे. अशातच इंग्लंड संघासाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाकडून नुकतेच दुहेरी शतक झळकावणारा जॅक क्राउले दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.

क्राउले मंगळवारी (२ फेब्रुवारी) ड्रेसिंग रूममध्ये उजव्या हातावर पडला. त्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे बुधवारी सराव सत्राला तो उपस्थित राहू शकला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, स्कॅन रिपोर्ट्सनुसार क्राउले उजव्या हाताच्या मनगटावर पडल्याने त्याच्या हातावर सूज आली आहे. त्यामुळे पहिल्या २ कसोटी सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंड संघाची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.’

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!