Share

धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप

Published On: 

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. त्यानंतर मुंडे यांच्यावरील संकट टळले असल्याचे स्पष्ट झाले.

मुंडे यांच्यावर हे गंभीर आरोप झाल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र अश्याप्रकारचे गंभीर आरोप झालेले मुंडे हे काही पहिले महाराष्ट्रातील नेते नाहीत. या पूर्वी देखील अनेक नेत्यांवर विनयभंग,बलात्कार आदी गुन्हे दाखल झालेले आहेत.

मेहबूब शेख

सध्या मुंडे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहीम शेख यांच्यावर देखील नुकताच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. घरगुती ट्युशन घेणाऱ्या महिलेला मुंबईला चांगली नोकरी लावून देतो, असे सांगून औरंगाबादेत बलात्कार केल्याप्रकरणी शेख यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपांमुळे मोठा वाद पाहायला मिळत आहे.

गणेश पांडे

भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याच्याविरुद्ध भाजयुमोच्या एका महिला कार्यकर्तीने विनयभंगाचा आरोप केला होता. यानंतर पांडे याच्यावर वर्सोवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता .गणेश पांडेवर कलम 354A, 509 आणि 34नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.त्यानंतर गणेश पांडेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

मतीन सैय्यद

मतीन सैय्यद हा एमआयएम मधून हकालपट्टी झालेला नगरसेवक आहे. ओळखीचा गैरफायदा आणि पिस्तूलाचा धाक दाखवून खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग करून औरंगाबाद येथील लॉजवर वारंवार अत्याचार करून, हर्सूल येथे एका घरामध्ये संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊ बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

आरोपीचा भाऊ व मेव्हुण्यानेही पीडित महिलेचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 3 जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.आरोपी आणि पीडित महिला २०१५ साली औरंगाबाद महानगर पालिकेत नगरसेविक म्हणून एकाच पक्षातून निवडून आले होते.

चरण वाघमारे

२०१९ साली कामगार सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे नेते माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली होती.पिडीत महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक वाघमारे यांना करण्यात आली होती. यानंतर चरण वाघमारे यांच्या अडचणी मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसून आले.

तौफिक शेख

सोलापुरातील एमआयएमचा नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख याच्यावर देखील गंभीर आरोप आहेत.विजयपूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल आहे. रेश्मा पडेकनुर तौफिक शेख विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेश्मा यांची विजयपूर येथे हत्या करण्यात आली होती.

नामदेव भगत

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या विरोधात देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. फार्म हाऊसवर नेऊन नामदेव भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तरुणीने केला आहे.२०१८ साली हा आरोप करण्यात आला आहे.भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र तिथे गेल्यावर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तक्रारदार तरुणीने केला आहे.

रोहित टिळक

एका महिलेचे शोषण केल्याच्या आरोपीखाली काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर देखील आरोप झाला आहे.पिडीतेने रोहित यांनी लग्नाचं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या आरोपांमुळे पुणे शहरात राजकीय भूकंप आल्याचे पाहायला मिळाले होते.

लक्ष्मण ढोबळे

मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याच्या आरोपानंतर त्यांची मोठी कोंडी झाली होती.त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ढोबळे यांनी मोठा आटापिटा केला. या केसचा निकाल नुकताच त्यांच्या बाजूने लागला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!