नांदेड: खरिपात शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. पण रब्बी हंगामात प्रमाणात पाणी आणि शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल झालेला पाहायला मिळाला. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यानी ज्या पिकातून उत्पन्न मिळते त्या पिकालाच महत्व दिलेले आहे.
नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात भातशेतीच्या क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. मराठवाड्यात भातशेती हे दुर्मीळ असले तरी यंदा उपलब्ध पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न निघणार आहे असे दिसत आहे.
या भागात भातशेतीचा शेतकऱ्यांनी केला प्रयोग –
सध्या शेतकरी उत्पदान वाढीसाठी प्रयत्न करत आहे. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी,गहू किंवा हरभरा याशिवाय शेतकरी अन्य पिकांकडे दुर्लक्ष करतो. तसेच यानुसार जिल्ह्यातील देरलूर, बिलोली आणि धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात भातशेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. भातशेतीचा प्रयोग नवा असला तरी तीन तालुक्यांमध्ये तब्बल 15 हजार हेक्टरावर धानाचे पीक बहरत आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी हे धाडस केले असून समाधानकारक उत्पादन मिळाले तर भातशेतीचे क्षेत्र वाढणार आहे. दिली तर विक्रमी उत्पादन मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांनी दिला आहे. पीकपध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीच्या अनुशंगानेच हा बदल केल्याचे शेतकऱ्यांचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –


