Share

‘अनेक नेत्यांना शिवसेनेत यायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करायचं आहे’

Published On: 

सांगली : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला उतरती कळा लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. खडसे यांच्यापाठोपाठ आणखी काही छोट्या-मोठ्या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला. काल, शिवसेनेचं शिवबंधन सोडून माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपात घरवापसी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात पुन्हा मेगा भरती होईल असे संकेत दिले होते.

मात्र, आज भाजपातील शेकडो स्थानिक नेते व कार्यकर्ते शिवसेनेच्या शिवबंधनात अडकले आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर राज्याचे गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘आम्ही कुणालाही झटके देण्यासाठी काम करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ होत आहे. शांत आणि संयमी स्वभावाने उद्धव ठाकरे यांनी वर्षभर राज्याचा कारभार हाताळला आहे. त्यामुळेच अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी देतानाच भविष्यात देखील शिवसेनेत भरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!