Share

कोरोनामुळे भारतीयांवर अनेक देशांनी घातली बंदी

Published On: 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. या परिस्थितीचा इतर देशांनी धसका घेतला आहे. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून भारतातून येणाऱ्यांवर बंदी घातली आहे. ब्रिटन पाठोपाठ कॅनडा, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती या देशांनी भारतासोबतची प्रवासी विमान वाहतूक पूर्णपणे बंदी केली आहे. ऑस्ट्रेलियाने विमानांच्या संख्येत कपात केली आहे. तर अमेरिका, इस्त्रायलने आपल्या नागरिकांना भारत दौरा टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्वप्रथम ब्रिटनने भारताचा लाल यादीत समावेश करत भारतातून येणाऱ्यांना बंदी घालण्याची घोषणा केली. शुक्रवारपासून ही बंदी लागू झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा भारतीय स्ट्रेन्सचे रुग्ण आढळत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ब्रिटिश नागरिक वगळता भारतातून कोणालाही पुढील आदेशापर्यंत ब्रिटनमध्ये प्रवेश मिळणार नाही. ब्रिटिश नागरिकांनाही भारतातून आल्यानंतर १० दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावे लागेल.

ब्रिटन पाठोपाठ कॅनडाने देखील भारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी लागु केली. कॅनडाचे परिवहन मंत्री उमर अल्घाब्रा यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या देशांसोबतची प्रवासी विमान वाहतूक ३० दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली.

संयुक्त अरब अमिरातीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर रविवारपासून बंदी लागू केली आहे. १० दिवसांसाठी ही बंदी असेल. त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. सिंगापूरने देखील भारतासोबतची प्रवासी वाहतूक बंद केली आहे. शनिवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या १४ दिवसांत भारतात गेलेल्यांना देखील सिंगापूरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!