पुणे – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनीच संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
स्वप्ना पाटकर यांनी आरोप केलाय की, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत. या बाबत थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.
दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये असे देखील पाटील यांनी सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकच सचिन वाझे की दोन-दोन सचिन वाझे आहेत, हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल – भातखळकर
- कारमधुन गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिस कोठडी
- विरारसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी – नाना पटोले
- 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे आठवलेंनी केले कौतुक
- ‘मुख्यमंत्र्यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा’


