औरंंगाबाद : लॉकडाऊन काळात शहरात विक्री करण्यासाठी कारमधुन गांजाची (कॅनबीस वनस्पती) वाहतूक करणा-या तिघांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून गजाआड केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आवेज खान महेबूब खान (वय २७, रा. मोमीनपूरा लोटा कारंजा), विजय संजय ठाकरे (वय २५, रा. अजनाळे ता.जि. धुळे), मोहम्मद इद्रिस मोहम्मद इसा (वय ३२, रा. गरम पाणी, छावणी) या तिघांना रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.तारे यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शहरात जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी तीन जण एका कारमधुन गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने चिकलठाणा ते वेंâब्रीज हायस्वूâल दरम्यान असलेल्या झाल्टा फाटा येथे सापळा रचून गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच-४७-सी-७५२८) अडवली. पोलिसांनी कारचालक मोहम्मद इद्रीस आणि आवेज खान या दोघांना ताब्यात घेतले. तसेच विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या विजय ठाकरे याला देखील ताब्यात घेतले होते. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये जवळपास ९ लाख ४७ हजार ८६० रूपये किंमतीचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा मिळून आला.
पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून ९ लाख ४७ हजार ८६० रूपये किंमतीचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा, एक विना क्रमांकाची दुचाकी, एक कार, तीन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १५ लाख ४९ हजार ९६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणात पोलिस अमंलदार विजय निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल तिघां आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बर्थ डे स्पेशल; ‘शिवाजी पार्क ते वानखेडे’ सचिनचा २२ यार्डचा प्रवास बनला ३ पिढ्यांचे प्रेरणास्थान
- निराश कर्णधार रोहितने मधल्या फळीवर फोडले पराभवाचे खापर
- सलग तीन पराभवानंतर पंजाबची गाडी विजयी ट्र्रॅकवर, ९ गडी राखुन मुंबईचा केला पराभव
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

