🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी या घडामोडींवर भाष्य केले आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयने एफआयआर दाखल केला हे स्वागर्ताह पाऊल आहे. या प्रकरणात खरा सचिन वाझे कोण, एकच सचिन वाझे की दोन-दोन सचिन वाझे आहेत, हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळेल. अनिल देशमुख महिन्याला १०० कोटींची खंडणी कोणासाठी गोळा करत होते? एफआयआरमुळे त्याचे धागेदोरे शोधणं आता सोपं होईल. यातले खरे गुन्हेगार गजाआड होतील असे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हेच मोदी सरकारचे सूत्र असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘नानाजी, आरोप – प्रत्यारोपांचा खेळ खेळण्यापेक्षा कोरोनाकाळात जनतेकडे लक्ष द्या’
- लसीच्या दराच्या मुद्द्यावरून देखील कुरबुर सुरूच,अशोक चव्हाण यांनी केली ‘ही’ मागणी
- विरारसारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी – नाना पटोले
- 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे आठवलेंनी केले कौतुक
- ‘मुख्यमंत्र्यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज तर अचूक ठरला, पण तयारी काय केली ते सांगा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
