अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रातील खेळ संपला आहे. इंग्लंडने लंचपर्यंत बिनबाद 6 धावा केल्या. इंग्लंड अजूनही 154 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडकडून डॉम सिबली आणि जॅक क्रॉली सलामी जोडी मैदानात नाबाद खेळत आहेत. त्याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 365 धावांवर आटोपला आहे.
यासह भारताने दुसऱ्या डावात 160 धावांची आघाडी घेतली आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि रिषभ पंत फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. तर दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टिकांचे सत्र सुरू आहे. अशातच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर अजिंक्य रहाणेच्या बॅटिंगवर नाराज आहेत
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रहाणे 27 रन करून आऊट झाला. रहाणेचा आत्मविश्वास सध्या कमी झाला आहे आणि त्या स्वत:ला असुरक्षित वाटत असल्याचं दिसत आहे. मागच्या काही काळापासून त्याच्या बॅटिंगमध्ये ही गडबड असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.
‘इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये रहाणे आक्रमक विचार घेऊन बॅटिंगला उतरला होता. मागच्या तीन-चार वर्षांपासून तो याच प्रकारे बॅटिंग करत आहे. अनेक वेळा त्याने सगळे शॉट खेळले. पण या टेस्टमध्ये त्याने खेळलेल्या अनेक शॉट्समध्ये नियंत्रण दिसलं नाही. त्याने जलद 27 रन केले हे खरं आहे. पण ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खेळाडूंना त्याच्या या बॅटिंगमुळे आत्मविश्वास मिळाला नसेल,’ अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- आखेर ‘त्या’ महिलांच्या आभूतपुर्व लढ्याला यश; दारुबंदीचा ठराव मंजूर
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू


