Share

आयपीएल मेगा ऑक्शनसाठी दिग्गजाने सोडले पाकिस्तान सुपर लीग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल केवळ भारतात नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात प्रसिद्ध आहे. विदेशी क्रिकेटर्स सुद्धा आयपीएलच्या हंगामात दौरे ठेवत नाहीत. याचाच प्रत्यय नुकताच पाकिस्तान सुपर लीगला आला आहे. पाकिस्तान सुपर लीगमद्ये मुलतान सुल्तानस संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी फ्लॉवर यांनी मेगा ऑक्शनसाठी स्पर्धा अर्ध्यावर सोडली आहे.

मुलतान सुलतान्सचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. संघ अजूनपर्यंत एकही सामना हारला नाहीये. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान संघाचे कर्णधारपद करत आहे, मात्र फ्लॉवरच्या जाण्याने संघाला अचानक धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी फ्लॉवर यांनी हंगामाच्या मध्यावर संघ सोडला आहे. मात्र त्याचे स्पर्धा सोडणे तात्पुरते असल्याचे पाकिस्तान बोर्डाने सांगितले आहे.

अँडी फ्लॉवर यांची लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. फ्लॉवर मेगा ऑक्शनसाठी स्पर्धा सोडून आले आहेत. ते ऑक्शननंतर परतणार आहेत . १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन बँगलोर मध्ये होणार आहे. मात्र तो पर्यंत मुलतान संघ १० दिवस प्रशिक्षकविना खेळणार आहे. दरम्यान, सुलतानला ५ आणि १० फेब्रुवारीला पेशावर जाल्मीसोबत सामना खेळायचा आहे. यानंतर ११ फेब्रुवारीला लाहोर कलंदरविरुद्ध सामना होणार आहे. १६ फेब्रुवारीला हा संघ कराची किंग्जशी भिडणार असून तोपर्यंत फ्लॉवरचे पुनरागमन अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!