Share

‘त्या’ घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक; आवश्यक मदत करण्याचे यंत्रणांना निर्देश

Published On: 

मुंबई: पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर भागातील गल्ली क्रमांक ८ मधील एका इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. या इमारतीचा लोखंडी सांगडा बांधकाम सुरु असताना अचानक कोसळून ही दुर्घटना घडली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

“पुण्यात येरवडा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री ठाकरेंनी शोक व्यक्त करत जखमींना चांगले उपचार तसेच मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक सर्व मदत करण्याचे यंत्रणांना निर्देश दिले आहेत”, असे ट्वीट मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर करण्यात आले आहे.

दरम्यान ही घटना काल रात्री ११ वाजेदरम्यान ही घटना घडली असून अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. इमारतीवर स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी रॉडचा सांगडा उभा करण्याचे काम सुरु असताना हा महाकाय सांगडा अचानक कोसळला. रात्रीच्या वेळीही हे काम सुरु होते. त्याखाली तेथे काम करीत असलेले अनेक कामगार त्याखाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!