🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. भाजपनं आम आदमी पक्षाच्या 7 आमदारांना 10 – 10 कोटीची ऑफर दिली. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ‘आप’ने केला आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले की, भाजपला दिल्लीत पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आमदार खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आपच्या सात आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची ऑफर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही आमिषं दाखविण्यात आली.
दरम्यान, याआधी देखील भाजपकडून असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना जनता चोख प्रत्युत्तर देईल, असंही सिसोदिया यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

