Share

बोलण्याच्या ओघात म्हणाले असतील; कायंदेंकडून गुलाबराव पाटीलांची पाठराखण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं वक्तव्य शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्याचं राजकारण तापताना पहायला मिळत आहे.

‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहेत. त्यावरुन अनेकांनी गुलाबरावांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावरुन आता शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी गुलाबराव पाटलांची पाठराखण केली आहे.

गुलाबराव पाटलांच्या तोंडून बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले असेल. त्यांच्या वाक्याचा शब्दश: अर्थ घेऊ नये. त्यांना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करायचे असेल. बोलण्याच्या ओघात बोलले असतील, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!