Share

तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

Published On: 

राजू थोरात/ तासगाव : तासगाव येथील गुंतवणूक सल्लागा सविता अविनाश चव्हाण यांची नुकतीच अमेरिका येथील ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत ‘कोर्ट ऑफ दि टेबल’ (सीओटी) साठी निवड झाली आहे. त्या एचडीएफसी लाईफ या कंपनीमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या अतिशय बिकट पार्श्वभूमीवर सविता चव्हाण यांनी हे यश संपादन केले आहे. संपूर्ण जगामध्ये एक टक्क्यापेक्षा कमी गुंतवणूक सल्लागार या परिषदेस पात्र होतात.

‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ ही संस्था सन १९२७ मध्ये अमेरिका येथे स्थापन झाली. जगातील आर्थिक सल्लागारांची ही जागतिक दर्जाची संघटना आहे. संस्थेचे जगातील ७० देशातील सुमारे ७२००० पेक्षा अधिक मेंबर्स आहेत. आयुर्विमा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जगातील मोजक्याच प्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड होते.

दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कॅलेंडर वर्ष कालावधीमध्ये विशिष्ट व्यवसाय पूर्ण करणाऱ्या प्रतिनिधींची या परिषदेसाठी निवड होते.१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये पात्र झालेल्या जगातील सर्व गुंतवणूक सल्लागार यांची जून २०२१ मध्ये न्यू ऑर्लास- अमेरिका येथे ‘मिलियन डॉलर राऊंड टेबल’ ही परिषद आहे.

कॅलेंडर वर्ष २०१९ मध्ये ही सविता चव्हाण यांची मिलियन डॉलर राऊंड टेबल, अमेरिका या परिषदेस निवड झालेली होती. सदरची परिषद ७ जून २०२० ते १० जून २०२० या कालावधीमध्ये अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया मधील अनाहेईम येथे होणार होती, परंतु कोरोनाच्या जागतिक अडचणीमुळे सदरची परिषद virtual स्वरूपात पार पडली. सविता चव्हाण या उच्चशिक्षित असून कै. प्राचार्य पी.बी. चव्हाण तासगाव यांच्या शुस्ना व तासगाव येथील आयकर, जी.एस.टी. सल्लागार अविनाश चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी आहेत.

गुंतवणूक सल्लागार म्हणून काम चालू केल्यानंतर अत्यंत कमी कालावधी मध्ये सविता चव्हाण यांनी पहिल्या वर्षी मिलियन डॉलर राऊंड टेबल (एम. डी. आर.टी.) व दुसऱ्या वर्षी कोर्ट ऑफ दि टेबलासीओटी) हा बहुमान मिळवला आहे. गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल सविता चव्हाण यांनी आभार मानले आहेत आणि भविष्य काळामध्ये गुंतवणूकदारांना दर्जेदार सेवा देत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सविता चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन करून नैसर्गिक परिस्थिती ठीक नसताना भविष्यकाळाचे नियोजन कसे करता येईल हा मोलाचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला. या यशामध्ये. सविता चव्हाण यांना खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!