🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.
पश्चिम बंगालसह पाच राज्यातील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ‘आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल. असे मोठे वक्तव्य पवारांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले कि, ‘पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल.’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टचा आज ५६वा वाढदिवस…
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, निलेश राणेंची मागणी
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
