Share

बंगालमध्ये ममता बॅनर्जी जोमात; व्हीलचेअरवरून मोठा रोड शो

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.

नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.

नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ममत बॅनर्जी व्हीलचेअरवरून कोलकताच्या गांधी मूर्तिजवळ पोहचल्या. त्यानंतर गांधी मूर्तिपासून हाजरापर्यत ‘रोड शो’ला सुरुवात झाली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

सदर हल्ल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

बुधवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून त्या वाहनात शिरण्याच्या बेतात असतानाच वाहनाचा दरवाजा त्यांच्या पाठीमागून ढकलण्यात आला. त्यात त्या जखमी झाल्या. हा अपघात नसून, हल्लाच असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी काल केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!