टीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशमधीचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपा मध्ये गलगीतुरा रंगला असतानाच, खासदार साक्षी महाराज यांच्या वादग्रस्त विधानाणे खळबळ उडाली आहे.
हिराण्यकश्यप नावाच्या राक्षसाचा मुलगा प्रल्हाद हा ‘जय श्रीराम’ म्हणायचा, तो रामाचा भक्त असल्याने त्याला हिराण्यकश्यपूने तुरुंगात डांबले. ह्याचीच पुनारावृतीन पश्चिम बंगाल मध्ये होत आहे. बंगालमध्ये ‘जय श्रीराम’ बोलणाऱ्याला तुरुंगात टाकलं जात. मला वाटत ममता बॅनर्जी ह्या हिराण्यकश्यपच्या वंशज आहेत. असं साक्षी महाराज म्हणाले.
सध्या बंगाल मध्ये, ‘जय श्रीराम’ म्हणाल्यावर ममता बॅनर्जी चिडू लागल्या आहेत. त्या शिव्या देत आहेत. लोकांना त्रास देत आहेत असा आरोपही साक्षी महाराज यांनी केला. साक्षी महाराज हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
