मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतले असे म्हटले होते. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतले होते आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एनसीबीने क्रूझवर टाकलेल्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. त्या आधीच नवाब मलिक आरोप करून मोकळे झाले आहेत, असं सांगतानाच नवाब मलिक यांच्या जावयालाही एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांनाही जबाबदार धरायचे का?, असा प्रश्न दरेकर यांनी केला आहे.
‘मलिक हे सरकारमधील मंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणं आणि इतर माहिती घेणं त्यांच्यासाठी सोप आहे. एनसीबीच्या धाडीत भाजप नेत्याचा मुलगा होता की नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे. पण मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मलिक यांना जबाबदार धरायचे की राष्ट्रवादीला? असा सवाल दरेकर यांनी केला. नार्कोटिक विभागाकडून पोलिसांकडून माहिती मिळवून ते तीर मारण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका दरेकर यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- नियम मोडून तुळजाभवानीचे दर्शन, भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- ‘उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर बसणे ही चांगली गोष्ट, हा योग अनेक वर्षांनी येतोय’ नारायण राणेंची प्रतिक्रिया
- ‘उद्घाटनाच्या वेळेला कोणतेही राजकारण करणार नाही’, नारायण राणेंकडून तलवार म्यान
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

