मुंबई : येत्या पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडावा का? या विचारात ठाकरे सरकार असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
राज्यपालांनी २४ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात महत्वाच्या तीन मुद्दयांवर लक्ष वेधले आहे. यामध्ये त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, विधानसभेचे अध्यक्ष निवडावे, अशा सूचना केल्या आहेत.
राज्यपालांच्या या पत्रावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलीये. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असं सूचित केलं आहे. मात्र विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील,’ असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा,’ असा आग्रह देखील नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची नेमणूक आणि १२ आमदारांची नियुक्ती प्रत्यक्षात कधी होणार याबाबत मात्र अद्यापही खुलासा झालेला नाही.
राज्यपालांचं नेमकं पत्र काय ?
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ २३ जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, मला अवगत करावे’ असं राज्यपालांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्मार्टफोन, टीव्ही, कार आणि फ्रिज ‘या’ कारणामुळे होणार महाग
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- मोठी बातमी : अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी भाजपचं थेट अमित शाहांना पत्र
- ‘..तर मग राष्ट्रवादीने धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केले नाही?’
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

