Share

‘..तर मग राष्ट्रवादीने धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केले नाही?’

Published On: 

सोलापूर : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक ओबीसी नेते आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते असतानाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद का मिळाले नाही. तसेच धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष का केले नाही, असा सवाल पडळकरांनी विचारला आहे. भाजपमध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीचे असून सत्ता असतानाही भाजपने अनेक ओबीसी समाजातील नेत्यांना संधी दिल्याचंही ते म्हणाले.

ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं होतं, मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असंही ते म्हणाले. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही ते म्हणाले.

‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!