मुंबई : मागील काही दिवसांपासून क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे देखील नवाब मलिक यांनी केले आहे. तसेच समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे अनेक पुरावे नवाब मलिक सादर केले आहे. यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धर्म आणि जात काढण्यावरुन मलिकांवर टीका केली होती. यावरून आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
I want to make it clear that the issue i am exposing of Sameer Dawood Wankhede is not about his religion.
I want to bring to light the fraudulent means by which he has obtained a caste certificate to get an IRS job and has deprived a deserving Scheduled Caste person of his future— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
काही दिवसापुर्वी मलिकांनी समीर वानखेडेंच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र दाखवले आहे. वडिलांचे जात प्रमाणपत्र दाखवण्यापेक्षा समीर यांनी त्यांचे स्वत:चे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानच नवाब मलिक यांनी वानखेडेंना दिले. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळल्यानंतर आज नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला आहे.
त्याचबरोबर त्यांनी समीर वानखेडेंच्या धर्मावरुन होत असलेल्या टीकेबाबत सांगितले. ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही. तर ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे, असे ट्वीट मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला
- भाजपच्या कार्यक्रमात गुंडांच्या सौभाग्यवतींची हजेरी; गदारोळ होताच चंद्रकांत पाटील म्हणाले, पास नव्हते!


