🕒 1 min read
मुंबई: त्रिपुरातील कथित घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरू झालं आहे.
अमरावती दंगलीत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा हात असल्याचा गंभीर आरोप हाजी अराफत यांनी केला आहे. मलिक यांनी मुंबईतून पैसे पोहोचवण्याचं काम केलं. नवाब मलिक यांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरींसोबत जुने संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली, असा गंभीर आरोप हाजी अराफात यांनी केलाय. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हा सईद नुरी बिळातून बाहेर येतो. भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत त्यांचंच नाव असल्याचंही अराफत यांनी सांगितलं.
याच पार्श्वभूमीवर या आधी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या दंगलीला भाजप जबाबदार असल्याचे म्हंटले होते. भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मात्र हे हिंदू संघटनांना बदनाम करण्यासाठी हे कट रचले जात असल्याचं हाजी अराफत यांनी म्हणलंय.
महत्वाच्या बातम्या:
- एसटीचा संप संपता संपेना; औरंगाबाद विभागात संपकऱ्यांनी केला टाळ-मृदुगांचा गजर!
- इथे येऊन पुन्हा भडका उडवायचाय का; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा सोमय्यांना सवाल!
- १०० टक्के लसीकरण झाले तरच ‘औरंगाबाद’ जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल-जिल्हाधिकारी
- रकुल प्रीत सिंहच्या हातात हे काय?; ‘छत्रीवाली’चा फोटो व्हायरल
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!


